उस्मानाबाद, दि, 09 : शेतकऱ्यांनी शेती मालाची विक्री कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे यांनी केले.   

 किनी ता. उस्मानाबाद येथे आयोजीत जागतिक मातृदिनानिमित्त शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य बाबत आयोजित जनजागृती कार्यक्रम प्रसंगी घाडगे बोलत होते. यावेळी मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी दीपक दहिफळे यांनी गावाच्या  निर्देशांकानुसार प्रमुख पिकास  दाखवा वयाच्या संतुलित खतमात्रा विषयी मार्गदर्शन केले. 

यावेळी कृषी महाविद्यालय उस्मानाबादचे सहयोगी प्रा. डॉ महेश वाघमारे यांनी म्रद दिन साजरा करण्याविषयीची संकल्पना विषद केली. तसेच पिकातील सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर कसा करावा व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे बाबत मार्गदर्शन केले.  यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व सांगून कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडल कृषी अधिकारी सत्यजित देशमुख यांनी केले.  कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वैभव लेनेकर यांनी केले .

यावेळी कृषी पर्यवेक्षक आनंद समुद्रे, नाईकनवरे , उपसरपंच विजय हाजगुडे, प्रगतशील शेतकरी बालाजी पाटील, आनंद दंडनाईक, शिवाजी हाजगुडे, कृषिमित्र शितोळे आप्पा, राऊत यांच्यासह महिला शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top