तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करावी असे राम मस्के यांनी. १८ रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 दि. १८ रोजी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,तामलवाडी ता. तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तसेच तुळजापूर तालुक्यातील रहीवासी आहेत.सध्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या  असुन या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सपोनि दत्तात्रय काळे हे जिल्ह्यातील माजी पालकमंत्री मंत्री यांच्या गावातील रहीवासी असल्याने त्यांचे काही राजकीय लोकांबरोबर संबंध आहेत.त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते राजकीय लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू शकतात. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन  सपोनि दत्तात्रय काळे यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी जेणेकरून लोकशाहीची मुल्ये जपली जातील किंवा लोकशाही धोक्यात येणार नाही. असे सामाजिक कार्यकर्ते राम मस्के यानी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.



 
Top