उस्मानाबाद, दि. 19 : दाळिंब ता. उमरगा येथील पोलीस पाटील अश्विनी वाले यांनी कोरोना महामारीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद येथील पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या हस्ते पोलीस पाटील अश्विनी वाले यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बाबर, पोनी, दगुभाई शेख आदी उपस्थित होते,
सन्मानपत्र मिळाल्याबद्दल मुरूम पोलीस ठाण्याचे एपीआय यशवंत बारवकर, येणेंगुर ओपीचे सूर्यवंशी, ग्रामसेवक वैराळे यांच्यासह ग्रामस्थांनी अश्विनी वाले यांचे अभिनंदन केले आहे