उस्मानाबाद, दि. 19 : इयत्ता बारावीचे परीक्षा फॉर्म भरुन घेणे सुरु असून या फॉर्ममध्ये हिंदु धर्माचा उल्लेख नाही. हिंदू धर्माच्या जागी फक्त नॉन मायनॉरीटी असा शब्द वापरला. त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करुन त्या ठिकाणी हिंदू धर्माचा समाविष्ट करावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने‍ उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 

निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे द्वारा इयत्ता 12 वीचे परिक्षा फॉर्म भरून घेणे सुरू आहे. सदरच्या अर्जात परिक्षार्थी यांची पुर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे. सदरच्या फॉर्ममध्ये कॉलम नं.10 मध्ये वि़द्यार्थी / परिक्षार्थी यांच्या धर्माचा उल्लेख आहे. परंतू सदर कॉलममध्ये अन्य धर्मिर्यांचा उल्लेख आहे. परंतू हिंदू धर्माचा उल्लेख नाही. हिंदु धर्माच्या जागी फक्त नॉन मायनॉरीटी असा शब्द वापरला आहे. सदरचा प्रकार हा जाणून बुजून केलेला दिसत आहे. वास्तविक नॉन मायनॉरीटी  या शब्दाच्या जागी हिंदू असा शब्द असणे आवश्यक  आहे. सदर फॉर्म मधील कॉलम तातडीने दुरूस्त करून त्यामध्ये हिंदू धर्माचा उल्लेख समाविष्ट  करावा, तसेच दोषी असलेल्याविरुध्द तातडीने कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजसिंहा निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, अमित कदम, गिरीश पानसरे, सुनिल पुंगडवाले, श्रीराम उंबरे, गणेश  इंगळगे, प्रविण सिरसाठे, सचिन लोंढे, राहुल शिदे, सुरज शेरकर, विशाल पाटील, भगवंत गुंड पाटील, प्रसाद मुंडे, ज्ञानेश्वर पडवळ, तेजस गोरे, अक्षय व्यास, आदी युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top