मुरूम, दि. १६ : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालायतील भूगोल विभागात गेल्या २८ वर्षापासून विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा.डॉ.नरसिंग कदम यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विषयाच्या पीएच.डी. च्या संशोधन मार्गदर्शक पदी नुकतीच त्यांना नियुक्ती पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीबद्ल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.किरण राजपूत, डॉ.महेश मोटे, डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ. अरुण बावा, डॉ.राम बजगिरे, डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ.सुभाष हुलपल्ले, प्रा.प्रतापसिंग राजपूत, डॉ.विलास खडके, प्रा.सुजित मटकरी, डॉ.अविनाश मुळे आदिंनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन महाविद्यालयाच्या वतीने डॉ.अशोक सपाटे यांनी त्यांचा सत्कार केले.