उस्मानाबाद, दि. 16 : राज्य निवडणुक आयोग,महाराष्ट्र राज्य यांच्या दि.11 डिसेंबर-2020च्या आदेशानुसार माहे-एप्रिल-2020 ते डिसेंब-2020 या कालावधीत मुदत संपणा-या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागास प्रवर्गातुन निवडणुक लढविणा-या इच्छुक उमेदवारांची त्यांचे जात वैधता करणे बाबतचे प्रस्ताव https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Online पध्दतीने (सेवाशुल्क पावतीसह)अर्ज भरुन संपूर्ण अर्जाची प्रत आवश्यक त्या मूळ कागदपत्रे व पुराव्यासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,उस्मानाबाद या कार्यालयास सादर करावे.

हस्तलिखीत (Off line) अपूर्ण अर्ज स्विकृत केले जाणार नाही.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 
Top