तुळजापूर, दि. 25 : प्रयोगशील शेतकरी व्हाट्साप ग्रुपच्या वतीने तुळजापुर शहरात पहिल्यांदाच मंगळवार दि. २९ डिसेंबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी "ऊस उत्पादन वाढीची चतु:सूत्री" या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मार्गदर्शन शिबिराचा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन व्हाट्साप ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
तुळजापूर खुर्द रस्त्यावरील कदम लॉन्स येथे मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता सदरील मार्गदर्शन शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरात कृषिभूषण सुरेश कबाडे, डॉ. अंकुश चोरमले - ऊसावरील किड रोग व्यवस्थापन व अमोल पाटील - गन्ना मास्टर तंत्रज्ञान एक ऊस शेतातील क्रांती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रयोगशील शेतकरी व्हाट्साप ग्रुपच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिर पूर्ण पणे मोफत असून ग्रुपच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.