नळदुर्ग : एस.के. गायकवाड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना.डॉ. रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाइं तुळजापूर युवा आघाडीच्या वतीने शुक्रवार दि. 25 डिसेंबर रोजी सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून गरिब निराधार महिलांना साडीचे वाटप करण्यात आले.
तुळजापुर येथील आनंद नगर हाडको या ठिकाणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रिपाइं युवा आघाडीच्या वतीने निराधार महिलांना रिपाइं उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष आनंद पांडगळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम, तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे आदींच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे कार्यकर्ते रवींद्र कदम, प्रा.कांबळे, तालुका सरचिटणीस केतन उर्फ मुन्ना कदम, तालुका युवा आघाडी सरचिटणीस शुभम कदम, तालुका नेते विष्णू सोनवणे, प्रमोद कांबळे, विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष राजपाल कदम, विद्यार्थी परिषद तुळजापूर शहराध्यक्ष पृथ्वीराज कदम यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.