कळंब, दि. 14 : शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमर (बाबू) चाऊस हे प्रत्येक वेळी नवनवीन कार्यक्रम घेऊन चर्चेत असतात. त्यांनी शहरातील नागरिकांसाठी शिबीर ठेवून वेगळा उपक्रम राबवला.

यावेळी त्यांनी  मोफत  पॅन कार्ड काढून देणे, व  मोफत  मतदान नाव नोंदणी ज्यांचे  मतदान कार्ड मध्ये नाव नाही,नवीन नाव लावणे,नाव  वाढवणे,मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करून देणे आदी कामे अगदी विनामूल्य काढून देणे असे एक शिबीर घेतले आहे. या कॅम्पमध्ये जवळपास पाचशे  नागरिकांनी या मोफत पॅन कार्ड व मतदार नोंदणी चा लाभ घेतलेला आहे . नाव नोंदणी सुरु असल्याचे त्यांनी कळवले आहे तरी गरजु नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन  त्यांनी केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक  होत आहे.

यापूर्वीही अमर चाऊस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती मिरवणूक, टिपू सुलतान जयंती,  आ दी सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्वधर्मसमभावाचा संदेश दिलेला आहे. सर्व धर्म समभाव यांची जपवणूक करणारे अमर चाऊस यांचे कौतुक होत आहे.

 
Top