खानापूर : बालाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटगाव, चव्हाणवाडी, नांदुरी व परिसरातील ऊस कारखान्यास जाऊन पन्नास दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप शेतकऱ्याना ऊस बिलाची रक्कम मिळाली नाही. ऊस बिलाची रक्कम एफआरपी दराने लवकरात लवकर द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
ऊस कारखान्यास घेऊन गेल्यापासून पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. पण ऊस घेऊन गेलेल्या एकही कारखान्याने अद्यापही उसाची रक्कम जमा न केल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. ऊस कारखान्यास जाऊन दोन महिन्यांच्या कालावधी उलटून गेला तरीही अद्याप एकाही कारखानाण्याने उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. अपवादात्मक मंगरूळ येथील कंचेश्वर शुगर ने शेतकऱ्यांना उचल म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये दिले आहे.
कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टी यामुळे आर्थिक संकटात आहे.त्यातून कारखाने उसाचे बिल लवकर देत नसल्याने उदनिर्वाह करणे कठीण बनले आहे.ऊसतोडणीचा खर्च सुद्धा व्याजाच्या पैस्याने केलेला आहे.तरी कारखाण्याने उसाची रक्कम तात्काळ जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
तुकाराम खलाटे, ऊसउत्पादक शेतकरी
या परिसरातील ऊस घेऊन गेलेल्या एकाही कारखान्याने दोन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरीही उस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खातत्यावर जमा केली नाही. लॉकडाऊन,अतिवृष्टी यामुळे शेतकरी अगोदरच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.ऊसाच्या पैस्यावर शेतकऱ्यांच अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी ऊस रक्कमेची आतुरतेने वाट पाहत आहेत.उसाच्या पैस्यावर पुढील वर्षभराच अर्थकारण अवलंबून असते.उसाचे रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
परिणामी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.कारखान्याने शेतकऱ्यांचा अंत बघू नये ऊस बिलाची रक्कम तत्काळ जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सभापती पंडित जोकार, तुकाराम खलाटे, सुधाकर चव्हाण, हणमंत चव्हाण,अतिश माने यांच्यासह येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.