कळंब, दि. 20 : तालुक्यातील युवकांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

कळंब तालुक्यातील युवक रणजित पिंगळे, लखन देहले, अक्षय दिक्षित, अरुण भोसले, प्रदीप काशीद, अनंत लहाने यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. या मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार सेनेचे बाळासाहेब कोठावळे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे, कळंब तालुकाध्यक्ष सागर बारकुल, उस्मानाबाद उपतालुकाध्यक्ष सलिम औटी, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर धुमाळ, मनविसे शहराध्यक्ष निलेश जाधव, सोमासे जालीदर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top