तुळजापूर, दि. 20 : साखर कारखान्यावर वजन काट्यात फेरफार करून शेतक-यांनी होत असलेली फसवणूक टाळण्याकरीता साखर कारखान्याचा वजन काट्यावर शेतकरी प्रतिनिधी नियुक्त करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील अनेक खासगी तसेच सहकारी साखर कारखान्यात जोमाने उसाचे गाळप सुरू आहे. मात्र काही साखर कारखाने वजन काट्यात फेरफार करून शेतकर्यांची फसवणूक करत असल्याचा तक्रारी असून शेतक-यांची फसवणूक टाळण्यासाठी वजन काट्यावर शेतकरी प्रतिनिधी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांची स्वाक्षरी आहे.