किलज : राम जळकोटे

सध्या सर्वत्र समाज कार्याचा वसा हाती घेऊन शिवविचार हे मनामनात रुजवण्यासाठी काम करीत असलेल्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवक्ते, इतिहासाचे युवा अभ्यासक, प्रसिद्ध व्याख्याते प्रमोद कारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठन अंतर्गत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा टीम यांच्यावतीने वाढदिवसाच्या निमित्ताने सलगरा (दि) येथील मधुशाली महाविद्यालयात वाचनासाठी उपयुक्त असणारी पुस्तके वाटप करण्यात आली.

शिविचारावर चालणारे हे प्रतिष्ठान समाजकार्य मध्ये सुद्धा तितक्याच हिरहिरीने भाग घेत आहे. या पुस्तके वाटप करण्याच्या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य स्वामी यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानचे उस्मानाबाद जिल्हा सदस्य प्रसाद राजमाने, राम जळकोटे, विशाल केदार, मनोज देवकते, प्रतीक भोसले, वैभव मुळे, अविष्कार फस्के, ॲड. काणिफ काणतोडे, शुभम नलावडे, गणेश काटे, किरण मोजगे, आकाश घालके आदीजण उपस्थित होते.

 
Top