तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील धोत्री गावचे सुपुत्र संतोष विठ्ठल हुक्के यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त गावातील ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
संतोष हुक्के हे ११ नोहेंबर २००३ रोजी शंकेश्वर (कर्नाटक) येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले.त्यांचा बेळगाव येथील मराठा रेजिमेंटल सेंटर येथे सराव झाल्यानंतर त्यांची पहीली पोस्टिंग बंगलुरू येथे झाली. त्यानंतर हुक्के यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, हैद्राबाद, लडाख अशा ठिकाणी सैन्य दलात राहुन देशसेवा केली.शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुणे याठिकाणी देशसेवा केली. अशा अनेक ठिकाणी राहुन मायभुमीचे रक्षण करणारे तुळजापूर तालुक्यातील धोत्री गावचे सुपुत्र संतोष विठ्ठल हुक्के हे दि.३० रोजी सेवानिवृत्त झाले. देशसेवा करुन सेवानिवृत्त झालेले संतोष हुक्के यांचा फेटा,पुष्पहार, शाल घालून धोत्री ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विजयकुमार नवले, दगडु क्षीरसागर, किशोर जाधव, साहेबलाल शेख, माजी सैनिक त्र्यंबक पाटील, धनाजी कदम,मालोजी थिटे व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम जवान यांनी केले.