काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदय माळी यांच्या पुढाकाराने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी कोरोना योद्धा पुरस्काराचे आयोजन रविवार दि. 13 रोजी करण्यात आले होते. या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ.जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने 15000 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक कुलस्वामिनी सुतमीलचे चेअरमन सुनिल चव्हाण यांच्या वतीने 11000 हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक पुणे येथील युवा उद्योजक दिलीप भाऊ फडके यांच्या वतीने 7777 रुपये ठेवण्यात आले आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सावरगाव येथे कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.स्मिता लोंढे, पशुवैद्यकीय अधिकारी पागे ,तलाठी रवींद्र अंदाणे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील, विद्युत महावितरणचे श्रीकांत हजारे, हरिचंद्र कदम, संजय लिंगफोडे,पांडुरंग राऊत, शिवसेना शाखाप्रमुख संजय कोळी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे चालक संजय रुपनर यांना डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदय माळी, काका फंड, ओंकार काढगावकर, बालाजी फंड, महेश दरेकर, सागर डोलारे, संयोजक अण्णा कदम, शुभम कानवले, अनिकेत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले तर आभार चंद्रोदन माळी यांनी मानले.