नळदुर्ग, दि. 09 : येथील वसंतनगरच्या माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश नकाते हे दि. 2 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने नळदुर्ग शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे नकाते यांचा सत्कार करण्यात आला.
सुरेश नकाते यांनी माध्यमिक आश्रम शाळेचा मुख्याध्यापक म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांनी शाळेला शिस्त लावण्याबरोबरच शाळेची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणात तब्बल तीन हजार झाडे लावून त्याचे संगोपन केले. याबद्दल त्यांना राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
दि. 2 डिसेंबर रोजी ते सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. 31 वर्षे 3 महिने इतकी प्रदीर्घ व यशस्वी त्यांची सेवा झाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल दि. 8 डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे नकाते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे आदीजण उपस्थित होते.