उमरगा, दि. 09 : आजच्या स्पर्धेच्या काळात बॅंकिंग व्यवहार हा विश्वास व चिकाटीने करावा लागेल. सर्वसामान्य, गरीब व गरजू व्यावसायिक मंडळीना उदिष्ट ठेउन काम केल्यास सर्वांनाच फायदा होइल, असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
येथील 'उमरगा अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेड' उमरगा या बॅंकेच्या उदघाटनप्रसंगी आ. चौगुले हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप अवधूत पुरी महाराज, हरी लवटे महाराज, ब्रम्हानंद महाराज जिल्हापरिषदचे बांधकाम सभापती अभय चालुक्य, शिवसेनेचे युवानेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, रोटरीचे डॉ. लक्ष्मीकांत डिग्गीकर, महादेव सूर्यवंशी, बाबुराव सुरवसे आदीजण उपस्थित होते.
सुरुवातीला फित कापून बॅंकेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार चौगुले यांनी बॅंकेच्या पदाधिकाऱ्याना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे शाल हार व पुष्पगुछ देउन पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तर यावेळी बॅंकेचे अध्यक्ष बालाजी सुर्यवंशी , चेअरमन धनराज गिरी, सचिव संगिता गोस्वामी, उपाध्यक्ष नवनाथ कमलापुरे यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मनोहर गिरी, सतीश गिरी, लक्ष्मण गिरी, विश्वजीत आरने, खंडू जमादार, राम गिरी, श्याम सुर्यवंशी, मलप्पा पुजारी, जयराम सूर्यवंशी, मनु महाराज आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गिरी व आरणे गुरुजी यांनी केले तर आभार धनराज गिरी यांनी मानले.