तुळजापूर, दि. 04 : येथील तहसिल कार्यालयात जिल्हा आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्यावतीने संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग अभियान 2020 या आशयाचे फलक उर्दू व मराठी भाषेत लावण्यात आला होता. सदरील बॅनरमध्ये उर्दू भाषेत लावलेल्या फलकावर आक्षेप घेत हिंदू राष्ट्र सेनेने तुळजापूर तहसीलदार यांना गुरुवार दि. 3 डिसेंबर निवेदन दिले होते.
त्यावरुन आज शुक्रवार रोजी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या आदेशावरून तो फलक काढून टाकण्यात आला आहे. यावेळी कर्मचारी वाघमारे, हिंदुराष्ट्र सेनाचे परिक्षित साळुंखे, दिनेश धनके, महंत माऊजीनाथ महाराज, विकास सुरवसे, योगी खुंटेफळ, अजित शिरसाट आदीजण उपस्थित होते