जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील आयएसओ मानांकन प्राप्त मानमोडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विक्रम पाचंगे यांना कै. रामलिंगअप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना दिला जाणारा राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला आहे.
पाचंगे यांनी मानमोडी शाळा आयएसओ करण्यापासून ते शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविणे, आदर्श महिलांचा सन्मान सोहळा, शाळेच्या परसबागेत उत्कृष्ट पालेभाजी बाग निर्मिती करणे, शाळा ई- लर्निंग, संपूर्ण शाळा डिजिटल सर्व शालेय रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आली.
यासोबत श्री. दयानंद पाटील, आनंद कानेगावकर ,श्री. बाळासाहेब जमाले ,श्रीमती मंजुषा स्वामी, श्रीमती संगीता भांडवले, श्रीमती महानंदा चिलगर यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने दि.२८ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. पाचंगे यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिपान गुंजकर ,उपाध्यक्ष शुभांगी सुरवसे, सरपंच गोपाळ सुरवसे, जळकोट बीट विस्तार अधिकारी जी.एन. सर्जे , केंद्रप्रमुख अरुण अंगुलेआणि ग्रामस्थांच्यावतीने पाचंगे यांचे कौतुक करण्यात येत आहे.