उस्मानाबाद, दि. 06 : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक संपन्न झाली.

या बैठकीत मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व समाज बांधवांनी सामाजिक उपक्रम घेऊन व प्रतिमेचे पुजन करून जयंती साजरी करण्याचे ठरले. तसेच उस्मानाबाद जिल्हा पदाधिकारी व उस्मानाबाद शहरवाशियांच्या वतीने जिल्हा शासकीय रूग्णालय येथिल कोव्हीड सेंटरमध्ये काम करत असलेल्या आरोग्य सेविकांचा साडी चोळी देऊन व आरोग्य सेवकंचा व सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्याचे ठरले.

प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची पुजा करून जयंती साजरी करण्यासंदर्भात उद्या दि. 7‍ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी जि प यांना निवेदन देण्याचे ठरले. तसेच यावेळी पोलीस विभागात कार्यरत असलेले प्रमोद मेंगले यांना व त्यांच्या संपुर्ण कुटुंबियांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु संपुर्ण कुटुंबाने यावर मात केल्यानो त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन शाल, श्रीफळ व फेटा घालुन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हा सचिव ॲड. विशाल साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले, संचालक लक्ष्मण निर्मळे, रमेश साखरे, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ता बेगमपुरे, शिवानंद कलशेट्टी, उमरगा उपाध्यक्ष शिवकुमार दळवी, प्रसिध्दी प्रमुख विजयकुमार देशमाने, संपर्कप्रमुख राजकुमार अंबुसे, तालुका उपाध्यक्ष शेखर अंबुसे, शहर संघटक मुरूम, जितेंद्र घोडके, शशिकांत बेगमपुरे, नितिन शेलार यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

 
Top