तुळजापूर, दि. 06 : राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार दि. ६ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी तुळजापुर यांच्या वतीने आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरअध्यक्षा संगीता कदम, नगरसेवक विशाल रोचकरी, माजी नगरसेवक अविनाश गंगणे, गुलचंद व्यवहारे, युवा नेते सागर कदम, सचिन रसाळ, सुहास साळुंके, बाळासाहेब शामराज, शिवाजी बोधले, विकास मलबा, गिरीश देवळालकर, प्रसाद पानपुडे, बाळासाहेब भोसले, अजय अमृतराव आदीसह भा.ज.पा. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.