तुळजापूर, दि. 06 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. ६ डिसेंबर महाविकास आघाडीच्या वतीने आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधीर कदम, युवा सेनेचे प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, रा.काँ. चे गणेश कदम, धनंजय पाटील, बबन गावडे, काँग्रेसचे विकास तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, उद्योग व्यापारी संघाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, रा.काँ. विद्यार्थी संघटनेचे युवा नेते समर्थ पैलवान, रा. काँ. चे शशीकांत नवले, रोहीत पेंदे, अशोक फडतरी, महेश चोपदार, सुभाष कदम, अभय माने, विकी घुगे, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे आदीसह रा.काँ., शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.