तुळजापूर, दि. 15 : वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयास संगणक संच भेट देण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे आयएसओ मानांकित असणारा उस्मानाबाद हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ही सर्व कामे लोकसहभागातून झाली होती.यात सातत्य राखणे गरजेचे आहे यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने आवाहन केले होते.तामलवाडी येथील बालाजी अमाईन्सनेही जिल्हा पोलिस दलास थर्ड आय स्मार्ट पेट्रोलिंग प्रणाली भेट दिली होती.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे म्हणाले की, सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या वात्सल्य सामाजिक संस्थेने दिलेल्या संगणक संचामुळे कार्यालयाच्या अभिलेखात अधिक सुसूत्रता येऊन कार्यालय पेपरलेस होण्यास मदत होणार आहे.
सदरील कार्यक्रमास सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. वर्षा कुलकर्णी, सौ.सुचिता हंगरगेकर अध्यक्षा श्रीमती प्रणिता शेटकार, आश्लेषा हंगरगेकर, प्राजक्ता हंगरगेकर, प्रवीण म्हमाने उपस्थित होते.