मुरूम, दि. १४ : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांना मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी नुकतीच प्रदान करण्यात आल्याबद्ल प्रा.डॉ.महेश मोटे यांचा श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला.
मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात सोमवार (दि.१४) रोजी आयोजित सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, प्रा.डॉ.सतिश शेळके, प्रा.डॉ.अरविंद बिराजदार, डॉ.रवि आळंगे, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.संध्या डांगे, डॉ.शिला स्वामी, डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा.मुकूंद धुळेकर, श्री.विरभद्र बरबडे आदींसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होती.
डॉ.महेश मोटे यांचा उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते फेटा,शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश पांचाळ, आकाश पांचाळ, भरत गाडेकर, प्रिया बिराजदार, अंबिका पाताळे, पुजा शिंदे, शुभांगी कुलकर्णी, निकीता पाताळे, अंजली स्वामी, मोनिका बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोटे सरांना मिळालेल्या डी.लीट पदवी या बहुमानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोज हावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.राम बजगिरे तर आभार शितल पाताळे यांनी मानले. यावेळी मोटे सरांचे विशेष अभिनंदन करुन विद्यार्थ्यांनी पेढे वाटून महाविद्यालयात आनंद साजरा केला.