काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील विद्यमान सरपंच तथा आपल्या कामगिरीने सामाजिक कार्यात व सर्वांच्या सुखदुःखात सतत अग्रेसर असणारे व सर्वांना आपलेसे वाटणारे रामेश्वर तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिवसभर सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. रविवारी सायंकाळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील व मित्रपरिवाराने निवासस्थानी जाऊन सरपंच रामेश्वर तोडकरी यांचा शाल, श्रीफळ, फेटा घालून  यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी चेअरमन अरविंद भडंगे, द्राक्षबागायतदार गणेश फंड, धर्मराज शिंदे, सुधीर मगर, अप्पासाहेब लिंगफोडे, आबा तानवडे आदीसह मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.

 
Top