उस्मानाबाद, दि. 15 : भास्कर महादेव मुंडे, रा. उक्कडगांव, ता. बार्शी हे दि. 14.12.2020 रोजी 13.00 वा. सु. येडशी साप्ताहीक बाजार येथे भाजी विक्री करत होते. यावेळी थोड्या अंतरावर लावलेली त्यांची हिरो पॅशन प्रो मो.सा. क्र. एम.एच. 13 बीवाय 9221 ही प्रेमदास गोपिनाथ राठोड, रा. शिवाजीनगर तांडा, ता. गंगाखेड, जि. परभणी हा ढकलुन नेत असतांना मुंडे यांनी पाहिले व त्यास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. अशा मजकुराच्या भास्कर मुंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.