उस्मानाबाद, दि. 10 : जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा विकास (सर्वसाधारण व विशेष घटक योजनेकरिता) अंतर्गत किमान 500 चौ.फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधकाम करणे,याशिवाय बांधकामामध्ये कार्यालय/भांडारगृह, प्रसाधनगृह इ.बाबीचा समावेश असावा.तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे,खुली व्यायामशाळा उभारणे(Open Gym)इत्यादी बाबीकरिता 7.00 लक्ष अनुदान मर्यादा आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील शासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्था(ग्रामपंचायत, नगरपरिषद,महानगरपालिका,जिल्हा परिषद,कॅन्टोनमेंट बोर्ड) शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग,अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक/ आश्रमशाळा व वसतिगृह,शासकीय उप जिल्हा रुग्णालय,शासकीय जिल्हा रुग्णालय,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आशा शाळा व महाविद्यालये आणि क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये/जिमखाना हे अनुदानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

तरी संबंधितांनी सर्वसाधारण व विशेष घटक योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण माहितीसह दि.17डिसेंबर,2020पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी केले आहे.

 
Top