जळकोट : मेघराज किलजे
अणदूर, ता. तुळजापूर येथील जवाहर महाविद्यालयातील कवी, साहित्यिक व संस्कृत विषयाचे प्रा. सत्येंद्र संगाप्पा राऊत यांना कल्याण मुंबई येथे नुकतेच आनंदश्री फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी दर्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. सत्येंद्र राऊत यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक जर्नल आणि कान्फरन्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेली आहेत. त्यासह पाच राज्यस्तरीय काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबरोबर कोरोना काळात निबंध स्पर्धा आयोजित करणे, वृत्तपत्र वाटप करणार्यांचे सत्कार घडवून आणणे, विद्यार्थ्यांना मदत करणे, गोरगरिबांना अन्नदान करणे अशा विविध योगदानाबद्दल आनंदश्री फांउडेशनच्यावतीने महात्मा गांधी विचार अभ्यासक लक्ष्मण गोळे, महात्मा गांधी विचार प्रसारक लेखिका प्रा.डॉ. संगीता नाईक, समुपदेशक सुदर्शन सबत तसेच आनंदश्री फांउडेशनचे अध्यक्ष मा. दिनेश गुप्ता यांच्या हस्ते प्रा. राऊत यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
प्रा. सत्येंद्र राऊत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी, रामदादा आलुरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, दीपमाला खडके, अरुणा आलुरे, उषा धाकतोडे, स्नेहल काळे,अनिल बोरकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.