तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारातील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानास श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा असलेल्या मुंबई येथील श्री देवी भक्त दापंत्याने नुकतेच दोन दिवसापुर्वी स्वतःच्या हाताने तयार केलेले श्री तुळजाभवानी मातेचे पेटींग फोटो भेट दिला.

मुंबई येथील श्री देवी भक्त वार्या व शैलेश कुलकर्णी या दांपत्याने श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमा फोटोस स्वःत रंगकाम करुन श्री तुळजाभवानी माता अलंकार रुपातील पेटींग तयार करुन प्रतिमा भेट दिली. श्री देवीचा प्रतिमा असलेल्या फोटो बनविण्यासाठी दोन दिवसाचा अवधी लागला. या फोटोसाठी ४० हजार रुपयाचा खर्च आला. 

यापुढेही श्री तुळजाभवानी मातेनी सेवा करण्यासाठी आम्हां दापत्यांना श्री तुळजाभवानी मातेने शक्ती द्यावी, या पुढील काळातही अधुनिक पद्धतीने हात कलेद्वारे आणखीन नविन काय करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी बोलताना सांगितले.

यावेळी येथील उद्योजक तथा श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी राजाभाऊ टोले, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे माहिती जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मंदीर संस्थानचे जयसिंग पाटील, विश्वास परमेश्वर, उपाध्ये पुजारी महेश अंबुलगे आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top