तुळजापूर, दि. १९ : तुळजापूर तालुक्यातील ज्या कुटुंबामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. अशा कुटुंबातील महिलासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या संकल्पनेनुसार एकल महिला शेतकरी आत्महत्या आत्मनिर्भर योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेल्या कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी गोरे यांनी केले आहे. 

तुळजापूर तालुक्यात 2011 पासून 2020 या कालावधीमध्ये 142 कुटुंबामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामधील केवळ 39 आत्महत्या झालेल्या कुटुंबातील महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित राहिलेल्या एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या खात्याअंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअंतर्गत आत्मनिर्भर महिला योजना तुळजापूर तालुक्यात यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना पुढील आठ दिवसांमध्ये या सर्व कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य यांनी आपापल्या मतदार संघामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती का कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन यानिमित्ताने उपसभापती गोरे यांनी केले आहे.

शेतकरी आत्महत्या झालेल्या विधवा महिलांना प्रशासन थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचून मदत करणार आहे यामध्ये आर्थिक लाभ आणि विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना प्रयत्नपूर्वक दिला जाणार आहे. यासाठी तालुका प्रशासनातील सर्व खात्याचे अधिकारी आणि गाव पातळीवर काम करणारे सर्व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, या प्रकरणी संबंधित कुटुंबांनी तातडीने प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन उपसभापती शिवाजी गोरे यांनी केले आहे.

 
Top