तुळजापूर, दि. 12 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्तदानाचे प्रमाण कमी झाले असल्याने सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथे ते किशोर मोरे यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबीरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व किशोर राजेंद्र मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.