तुळजापूर, दि. 12 :  एस.बी.आय फाऊंडेशन, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्याती रामतीर्थ, रामनगर, गायराण तांडा, येडोळा व जकणी तांडा या दत्तक गावात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन प्रत्येक गावात युवकांचे समक्षीकरण व्हावे या हेतूने युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. 

मंडळाचे बचत खाते एस.बी.आय बँकेत उघडून बचत करण्याचे ठरले.  
यावेळी दिलासाचे प्रकल्प समन्वयक विलास राठोड, गुरुदेव राठोड, भुषण पवार, अजित राठोड, सतिश राठोड, श्रीनिवास राठोड, उद्धव राठोड, इंद्रजित पवार, सुनिल जाधव, राजकुमार राठोड, विकास पवार, अजित पवार, अरविंद राठोड, भिल्लू चव्हाण, अमोल पवार, अमित लोंढे, सुरेश लोंढे, देवानंद लोंढे, मारुती लोंढे, पिंटु जाधव, बाळु चव्हाण आदि युवक उपस्थित होते.
 
Top