अचलेर : जय गायकवाड

सोलापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने आज सोलापूर येथे घेण्यात आलेल्या १४, १६ आणि १८ व २० वर्षे वयोगटातील राज्य निवड चाचणीच्या 3 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत लोहारा तालुक्यातील अचलेर भीमनगर येथील सुपुत्र प्रशिल परमेश्वर माने हा धावपटू सर्वप्रथम आला असून त्याची राज्य पातळीवरील गटात निवड झाली आहे.

या चाचणी निवड स्पर्धा आज सोलापूर येथील नेहरू नगर च्या शासकीय क्रीडांगणावर पार पडल्या. आज सोमवार दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी या चाचणी स्पर्धा, संस्था व वैयक्तिक गटासाठी ही घेतल्या गेल्या.या चाचणी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १० वी बोर्ड प्रमाणपत्र ग्राह्य धरले गेले होते. नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर आज सकाळी ९-३० वाजेपर्यंत प्रवेश स्वीकारण्यात आले होते.

अशी माहिती सोलापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजु प्याटी यांनी दिली. प्रशिल परमेश्वर माने हा अतिशय उत्तम धावपटू असून त्याची ३ हजार मीटर धावण्याच्या राज्य  चाचणी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सोलापूर  येथील महानगरपालिका कर्मचारी पथसंस्थेचे अधिकारी परमेश्वर माने यांचा प्रशिल  मुलगा आहे.
 
Top