तुळजापूर : सतीश महामुनी
श्री तुळजाभवानी मंदिरासमोर जिजाऊ महाद्वारात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती तुळजापूरकरांच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, प्रतिष्ठित व्यापारी धर्मराज पवार, भाजप नेते इंद्रजीत साळुंके, शिवसेना नेते सागर इंगळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नितीन रोचकरी, छावा संघटनेचे कुमार टोले, विशाल भोसले, जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके, सचिव महेश चोपदार, सहसचिव महेंद्र शिंदे, पत्रकार जगदीश कुलकर्णी, भाजप नेते बाळासाहेब भोसले, शिवाजी पवार, विनायक सरवदे, गोरखनाथ पवार, समाजसेवक विजय भोसले आदी सह मान्यवर पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिरासमोर जिजामाता प्रतिष्ठान यांच्यावतीने लाडू प्रसाद वाटप करण्यात आले .