चिवरी : राजगुरु साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक विठ्ठल मारुती होगाडे  यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी   गेल्या आठ महिन्यापासून सैन्य दलाचे पोलीस दलाचे मोफत प्रशिक्षण देण्याचा त्यांचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. होगाडे यांनी स्वतःच्या शेताला मैदान बनवून विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या श्री महालक्ष्मी करिअर अकॅडमी मोफत प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन  तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ सिद्रामप्पा खजूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी आयुष्यभराची तरतूद करण्यासाठी सक्षम पिढीचे संगोपन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यसनाधीनतेपासून दूर राहणे अशी व्यक्त केले. तसेच सारिका काळे आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सामान्य-ज्ञान अंगीकारणे गरजेचे आहे तसेच मोबाईल वरील खेळापेक्षा मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शंकराप्पा कोरे, रामचंद्र आलुरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, चेअरमन बालाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, पोलीस नाईक अमोल मंक्राज, एस बी ग्रुप चे अध्यक्ष सचिन बिराजदार, कैलास शिंदे, गोपाल लोहार, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top