तुळजापूर, दि. 12 : सतिश महामुनी
केंद्रीय आयुष मंत्री नामदार श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नी सौ विजया श्रीपाद नाईक यांच्या झालेल्या अपघातामध्ये विजयाताई यांचा झालेला आकस्मित मृत्यूने तुळजापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि नाईक परिवाराची स्नेही भाजपाचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे यांनी शोक व्यक्त केला आहे.
देशाची संरक्षण राज्यमंत्री व आयुष मंत्री आमदार नाईक यांच्या पत्नी सौ विजयाताई श्रीपाद नाईक कर्नाटकात प्रवासात असताना झालेल्या अपघातामध्ये सौ विजया नाईक यांच्या निधनाने तुळजापूर शहरात भाजप आणि नाईक परिवार स्नेहा असणाऱ्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला ही घटना घडली आहे यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आणि आदरांजली वाहिली आहे.
तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग होण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी तुळजापूर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिल्ली येथे प्रयत्न केलेले आहेत तसेच तुळजापूरची तुळजाभवानी ही कुलदेवता त्यामुळे सातत्याने त्यांनी सहकुटुंब सहपरिवार देवीची पूजा करण्यासाठी तुळजापूर येथे केलेले आहेत त्यामुळे त्यांचे त्यांचे कौटुंबिक स्वरूपाचे बनलेले आहे या पार्श्वभूमीवर सौ विजया ताई यांचे झालेले निधन या कार्यकर्त्यांना प्रचंड दुःख देणारे ठरले आहे.
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विजयाताई यांच्या निधनाने नाईक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुःख सहन करण्याची शक्ती आई तुळजाभवानी नाही कुटुंबियांना देवो अशी प्रार्थना करीत असल्याचे सांगितले. जिल्हा भाजपा चिटणीस गुलचंद व्यवहारे यांनी सौ. विजया नाईक यांचा तुळजापूरचा स्नेह खूप जुना आहे, अत्यंत प्रेमाने त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना स्नेह दिला आहे तो आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा शब्दात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, पंचायत समिती उपसभापती शिवाजी गोरे, प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, उमेश गवते, बाळासाहेब शामराज, इंद्रजीत साळुंके,शिवाजी बोदले, दिनेश बागल, राम चोपदार, सुहास साळुंके, यांनी दुःख भावना व्यक्त केल्या.