तुळजापूर : डॉ. सतीश महामुनी

महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने लोणावळा येथे घेण्यात आलेल्या शिक्षण परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडामंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) च्या शाळेला सन 2019- 2020 शैक्षणिक वर्षाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदरचे आमदार संजय जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक  दत्तात्रय जगताप, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मा.औदुंबर उकिरडे हे होते. नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.अर्जुन कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

 नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) च्या शाळेला या अगोदर 2008-09, 2009-10या सलग दोन वर्षाचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता तसेच या शाळेने 2015 मध्ये मराठवाड्यातील पहिले ISO मानांकन प्राप्त केले होते. याच बरोबर या शाळेतील प्रत्येक वर्गातील मुलांना टॅब आणि संगणक या शैक्षणिक सुविधा देण्यात आलेल्याआहेत तसेच शाळेने परसबाग,गांडूळ खत निर्मिती असे विविध उपक्रम राबवले मुळे शाळेला 2019 -20 चा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोटे तुकाराम, सहशिक्षक श्री.शेंडगे अशोक ,श्री. बालाजी साळुंके, श्री. जालिंदर राऊत ,श्री. विश्वजीत निडवंचे यांनी स्वीकारला. नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नगर परिषद तुळजापूर चे नगराध्यक्ष श्री.सचिन  रोचकरी, मुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे ,शिक्षण सभापती सौ.मंजुषाताई देशमाने,नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई भोजने व उपाध्यक्ष श्री. रणजीत भोजने आणि समस्त नगरवासियांनी शाळेचे अभिनंदन केले.

शाळा क्रमांक 3 आणि पुरस्कारप्राप्त शाळा आहेत या प्रशालेतील शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सक्रिय केल्यामुळे प्रशाला सर्वांगाने विकास आणि प्रगती चालवली आहे सातत्याने प्रशालेने उपक्रमशील केवळ पुरस्कार प्राप्त केले आहेत.

- पंडित जगदाळे, नगरसेवक

 
Top