काटी : उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील धोत्री येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे संकल्पनेनुसार किसान संपर्क अभियान व महा राजस्व अभियान अंतर्गत बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी यांच्या वतीने राबविण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत कर्ज वसुली व विविध योजना बाबत शेतकऱ्याना माहीती देण्यात आली.
यावेळी बॅकेचे ' प्रवर्तक अमरेद्र कांत तामलवाडी शाखेचे अभिषेक कुमार, मेघा धारीया एस नलिन कैलास पाटील, तलाठी ग्रामसेवक भीमराव झाडे, सरपंच अश्विनीताई साठे, पंचायत समिती सदस्य शिवाजीराव साठे उपस्थित होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की गावातील ग्रामस्थांचे प्रशासनाच्या संदर्भात काही तक्रार असल्यास लेखी स्वरूपात कार्यालयाला कळवावे व बॅकेविषयी व शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनेसंदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन केले. बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी शाखेच्या वतीने हे गंजेवाडी ,धोत्री, पिंपळा (बु.) या ठिकाणी राबविण्यात आले.