तुळजापूर : सतीश महामुनी 

बहुजन वंचित आघाडी सर्वसमावेशक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण यामध्ये बहुजन वंचित आघाडी चा कायम प्रभाव आहे, अशा शब्दात बहुजन वंचित आघाडीचे नेते मिलिंद रोकडे यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला.

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधुन वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते भिमराव अर्जुन सोनवणे बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार वंचित बहुजन आघाडी चे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते मिलिंद रोकडे जीवन कदम, कमलेश कदम,  सुरेश चौधरी, सुरेश मस्के, ज्ञानेश्वर बनसोडे यांची यावेळी  उपस्थित होती.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष पार्टी असा विषय नसतो. मात्र भीमराव सोनवणे विचाराने बहुजन वंचित आघाडी कायम जोडलेले आहेत. त्यांचा विजय आमच्यासाठी गौरवास्पद आहे असे उद्गार यानिमित्ताने श्री रोकडे यांनी काढले.

 
Top