काळेगाव : प्रकाश साखरे
काळेगाव ता. तुळजापूर येथील श्री संगमेश्वर विधायक महापरिवर्तन विकास पॅनलच्या प्रचारास आजपासून सुरूवात झाली आहे. प्रचाराची सुरूवात टेलर वस्ती वरून करण्यात आली.
प्रचाराच्या वेळी जनतेला पॅनल मधील उमेदवाराची नावे व त्यांच्या चिन्हाची ओळख करून देण्यात आली. प्रचारास पॅनल प्रमुख खंडु उंबरे, ज्ञानोबा उंबरे, शंकर घाडगे, विनायक उंबरे, उध्दव उंबरे, विकास पाटील, चंदर शिंदे, आप्पासाहेब साखरे, बाळु कचरे, दादा कदम, धनाजी मुळे, खंडु जाधव, मधुकर साखरे, काशिनाथ उंबरे, मधुकर घाडगे आदीजण उपस्थित होते.