तुळजापूर : सतीश महामुनी

राज्यभर लहुजी शक्ती सेना सामाजिक प्रश्नावर सातत्याने संघर्षाची भूमिका घेऊन समाज बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे असल्याचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी बोलताना सांगितले.

तुळजापूर येथे उत्तर महाराष्ट्र लहुजी शक्ती सेनाचे अध्यक्ष सिनेट सदस्य प्रा. दिनेश खरात यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा तुळजापुरात प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, राज्य समन्वयक अजय कांबळे, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी कांबळे, विक्रम लोंढे, विशाल लोंढे, डॉ. सतिश महामुनी यांची याप्रसंगी उपस्थित होती. 

लहुजी शक्ती सेना महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सामाजिक प्रश्न आणि युवकांचे प्रश्न घेऊन सातत्याने वर्षानुवर्षे काम करीत आहे. संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी केलेले संघटन आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात संघटनेने उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे ही लहुजी शक्ती सेना ची जमेची बाजू आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि प्राध्यापक खरात यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, प्रदेशाध्यक्ष कांबळे यांनी उत्तर महाराष्ट्रातील कामाचे कौतुक केले.

 
Top