हन्नुर : नागराज गाढवे 

अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडी आणि श्री महालक्ष्मी महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत आहे. डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वार्डातून उमेदवार निवडून द्यायचे आहे. पंधराशे मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे गौराबाई चंद्रकांत उदगीरे, दिपाली आनंद गायकवाड, गितांजली विवेक नारायणकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर इतर सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.

श्री महालक्ष्मी शेतकरी शेतमजूर कामगार आघाडीचे उमेदवार वार्ड क्रमांक एक मधून चिदानंद स्वामी राव माळगे, दिपाली दिलीप सुलगडले, श्रीदेवी भिमशा सवळे, वार्ड क्रमांक दोन मधून रुक्मिणी शिवाजी माशाळकर, नागनाथ मल्लिकार्जुन भोळे, तर वार्ड क्रमांक तीन मधून शिवलाल बाबुराव नारायणकर हे निवडणूक लढवत आहेत.  तर यांच्या विरोधात श्री महालक्ष्मी महाविकास आघाडीचे उमेदवार वार्ड क्रमांक एक मधून शितल शिवानंद चिवरे, विरेश्री अशोक सुलगडले ,दाऊद इक्बाल मकानदार, वार्ड क्रमांक दोन मधून रतन अंबादास शिंदे, हसीना इक्बाल फकीर तर वार्ड क्रमांक तीन मधून आर पी आय आठवले गटाचे उमेदवार संदीप गायकवाड हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संदीप गायकवाड हे श्री महालक्ष्मी महाविकास आघाडी कडून लढवत आहेत. 

डोंब रजवळगे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन जकिकोरे आणि सुनंदा कल्याणी चितळे हे वार्ड क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार नशिब अजमावत आहेत. तर वार्ड क्रमांक तीन मधून उत्तम गायकवाड हे अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. ग्रामस्थांची बैठक घेण्यात आले. पण एकमत झाले नाही. सध्या दोन्ही गटातील उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर अपक्ष उमेदवार आपल्या वार्डातील मतदारांची गाठीभेटी घेत आहेत.

दोन्ही गटातील प्रमुख नेते मतदारांना आपल्या गटातील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तर अपक्ष उमेदवार गावचा विकास करण्यासाठी युवा उमेदवारांना संधी देण्याची गरज असल्याचे प्रचारात सांगत आहेत. दोन्ही गटातील उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. डोंब रजवळगे ग्रामपंचायत निवडणूक भाऊ बंदकीमध्ये लढवली जात आहेत. गेल्या वेळी एकाच गटातून निवडणूक लढविलेले उमेदवार सध्या एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. नातेवाईक दोन गटातून निवडणूक लढवत असून कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे याची चिंता मतदारांना लागली आहे.

डोंबरजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. गावातील अनेक मतदार परगावी असून सर्व उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत. डोंबरजवळगे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे १८ जानेवारी रोजी मतमोजणी नंतर ठरणार आहे.

 
Top