नळदुर्ग, दि. 10 : तुळजापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. या निवडणुकीत तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत असून प्रभाग क्रं. 1 मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामविकास पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील या बुधवार दि. 13 जानेवारी रोजी हलगूर गावात येणार आहेत. 

हगलूर ग्रामपंचायतीच्या सात जागेसाठी निवडणुक होत असून 21 उमेदवार रिंगणात आहेत. या गावची मतदार संख्या 800 आहे. या निवडणुकीत  तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. तुळजाभवानी ग्रामविकास पॅनेलकडुन प्रभाग क्रं. 1 मध्ये  ॲड.  जयपाल नालंदा पाटील निवडणुक लढवत आहेत. संपूर्ण  सुशिक्षित आणि तरुण वर्ग त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या प्रचारार्थ येत्या 13 जानेवारीला रुपाली पाटील ह्या हगलूर गावात प्रचारसाठी येणार आहेत. त्यांचे मूळगाव हगलूर आहे. 

ॲड. रुपाली पाटील मनसे पक्षाच्या प्रमुख नेत्या असून त्यांची क्रेझ तरुण वर्गात जास्त आहे. यापुढे त्या हगलूर गावाकडे स्वतःहून लक्ष देणार असल्याचे समजते. त्या पॅनलच्या मार्गदर्शक व आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहेत. त्या हगलूर गावात 3 महिन्यातून एकदा जनता दरबार घेणार आहेत. तसेच त्या गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असून वातील गोर-गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे ॲड. जयपाल पाटील यांना बोलताना सांगितले.

 
Top