तुळजापूर, दि. 11 : आजारपणाला कंटाळून एका 28 वर्षीय तरुण बसचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तीर्थ (खुर्द) ता. तुळजापूर येथे रविवार दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी सुसाईट नोट आढळून आली असून त्यात आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

सुहास शंकर पवार (वय 28 वर्षे, रा. तीर्थ खु., ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या बसचालकाचे नाव आहे. सुहास पवार हे करमाळा (जि. सोलापूर) आगारात गेल्या पाच वर्षापासून बसचालक म्हणून कार्यरत होते. साप्ताहिक असल्याने पवार हे गावाकडे आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यानी उपचार केला असता किडनी निकामी झाल्याचा रिपोर्ट आला होता. या आजारपणाला कंटाळून त्यानी टोकाचा पाऊल उचलत रविवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने पवार कुटूंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, सुहास पवार यांचा लॉकडाऊनच्या काळात गावातीलच एका तरुणीसोबत विवाह ठरला होता. परंतु विवाह होण्यापूर्वीस आजारपणाला कंटाळून सुहासने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Top