जळकोट : मेघराज किलजे
कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मुंबईमध्ये व महाराष्ट्र मध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता नंदगाव (ता.तुळजापूर) येथील तरुणानी स्वतः पुढाकार घेऊन जवळच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर यांना नंदगाव गावात बोलावून रक्तदान केले. त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे रक्तपेढीमधील वैद्यकीय तज्ञ तसेच कर्मचारी भारावून गेले. रक्तदान केलेल्या तरुण-तरुणींना आवर्जून स्वामी विवेकानंद बोध वचने हे पुस्तक डॉ स्वास्तिक शहा यांनी भेट दिले.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे वर्षभर या ना त्या कार्यक्रमानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झालेला असल्यामुळे रक्तदानाच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी रुग्णांना मदत मिळावी. या भावनेने डॉ. स्वास्तिक शहा व वैभव पाटील यांच्या प्रयत्नातून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सोलापूर येथून डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अधिकारी डॉ. हरिश्चंद्र गलीयात व जनसंपर्क अधिकारी सुनील हरहरे हे उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी पं. स. सदस्य सिद्धेश्वर कोरे , सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी ,मल्लिनाथ गुंड, डॉ. स्वस्तिक शहा, वैभव पाटील ,दत्ता शेवाळे, रमाकांत पाटील ,स्वप्नील कट्टे ,सागर पाटील, प्रदीप मोहरीर, दिनेश तुपे, गुरुसिध्द कट्टे, धोडीराम पांचाळ, विवेक शेवाळे आदीनी परिश्रम घेतले.