तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूर शहरातील काशी रोड भागात नगरपरिषदेचे दुर्लक्ष आणि नागरिकांची बेफिकिरी यामुळे रस्त्यावर कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे याचा फटका निष्कारण सभोवताली राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे.
तुळजापूर येथील घाटशिळ रोड जवळ साळुंखे फोटो स्टुडिओ भागात सातत्याने नागरिकांची बेफिकिरी होत असल्यामुळे घराशेजारी असणाऱ्या कचराकुंडी पेक्षा रस्त्यावर कचरा फेकला जातो. त्यामुळे डुकरे आणि इतर प्राण्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. याप्रकरणी नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला तरी ही परिस्थिती बदलत नाही. याचा त्रास रहिवाशांना होत आहे.
सदर प्रभागाच्या नगरसेवकांनी या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे. सोमवारी सकाळी कचरा टाकण्यावरून येथील महिलांमध्ये वादावादीचे प्रकार घडले त्यानंतर देखील दिवसभर तिथे कचरा पडला आणि त्याचा त्रास शेजारी राहणाऱ्या घरांना झाला आहे, परिणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आहे.