नळदुर्ग दि. 11 , शहरातील मल्लिकार्जून मंदिर सभागृहात सोमवार दि . 11 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ९५ दात्यानी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या प्रांरभी राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून आभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजीराव मोरे, कार्यक्रमाचे उद्घाटक डाँ. सिद्रामप्पा खजुरे, प्रमुख पाहुणे महामार्गचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत कवले, शफी शेख, अझहर जहागीरदार शहबाज काझी, रमेश पिस्के उपस्थित होते. सोलापूर येथिल अश्विनी रूग्णालयाच्या पथकाने रक्तसंकलन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाले, राजेंद्र तोग्गे, मल्लिनाथ लामजणे, कल्लाप्पा कलशेट्टी, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र काळे, मुन्ना वाले, मनोज राजमाने, युवराज साखरे, अँड. आनंद बताले, असद इनामदार आदिनी पुढाकार घेतले.