तुळजापूर, दि. 11 : येथील युवकांच्या सतर्कतेमुळे रस्ता चुकलेल्या लातूर येथील एका वयोवृद्धास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातुर येथील सूर्यकांत अंबादास सुरवसे हे वयोवृध्द तुळजापूर शहरातील एस टी कॉलिनी येथे फिरताना आढळून आले असता येथील युवक दीपक चोगुले, महेश कांबळे, रितेश कवडे, समाधान नवगिरे, अक्षय कंदले यांनी त्यांची विचारणा करून सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर यांना याबाबतची फोनवर माहिती दिली. वयोवृद्ध आजोबांना त्यांच्या गावाची विचारणा केली असता त्यांनी लातूर येथील पारिजात मंगल कार्यालय जवळ राहत असल्याचे सांगितले. त्यावरुन संजयकुमार बोंदर यांनी शिवाजी चौक पोलीस स्टेशनला संपर्क करून कल्पना दिली. सदरील वयोवृद्धास तुळजापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.