तुळजापूर, दि. १२ : सतीश महामुनी

 तुळजापूर येथील लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल येथे माध्यमिक वर्गाची उपस्थिती ९० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विद्यार्थ्याने पालकांमध्ये शालेय उपस्थितीबाबत उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. प्रशालेच्या प्राथमिक विभागात ३५० विद्यार्थ्यांना दोन महिने पुरेल असा शालेय पोषण आहार वितरित करण्यात आला आहे. 

शहरातील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल या प्रशाले ने प्रशासनाधिकारी डीआर मोरे आणि मुख्याध्यापक राठोड, प्राथमिक मुख्याध्यापक संजय पवार, सहशिक्षक गव्हाणे, सहशिक्षक गवळी यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने विविध उपक्रम चालवले आहेत त्यांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे यादरम्यान प्रशालेतील उपस्थिती इयत्ता नववी व इयत्ता दहावी ९० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पालक वर्गामध्ये प्रशालेच्या विविध उपक्रम आणि विध्यार्थी उपस्थिती बाबत सकारात्मक ता दिसून आली आहे.

प्रशालेच्या प्राथमिक विभागात ३५० विद्यार्थ्यांना दोन महिने पुरेल असा शालेय पोषण आहार वितरित करण्यात आला आहे. यानिमित्ताने पालकांमधून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी उत्सुकता दिसून आली मुलांसाठी शाळा केव्हा सुरू होणार आहे अशा प्रकारची विचारणा पालकांमधून शाळेच्या प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

 
Top