तुळजापूर, दि १६ : सतीश महामुनी
जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत तुळजापूरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची महापूजा छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने करण्यात आली.
श्री क्षेत्र तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे सर्व समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मरणातून प्रत्येक तरुणाच्या अंगामध्ये जोश आणि समाजाबद्दल सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या समाजाचे दैवत आहेत अशा शब्दात क्रांतिवीर सेनेचे नेते महेश गवळी यांनी तरुणांना या कार्यक्रमानंतर शुभेच्छा दिल्या.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक कुमार टोले, अण्णासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, महेश चोपदार, प्रशांत इंगळे ,दत्तात्रय सोमाजी, प्रशांत अपराध, राजाभाऊ घाडगे, पृथ्वीराज परदेशी, तुकाराम डोंगर, तुकाराम ढेरे, छावाचे तालुकाध्यक्ष औदुंबर जमदाडे इत्यादी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.